मित्रांनो नमस्कार
मी मयूर विनायक चिटणीस , मूळचा जालन्या चा , सध्या पुण्याला खराडी परिसरात राहतो. पुण्यात जे काही लाखो महिती तंत्रज्ञ आहेत त्यापैकी मी एक. मागच्या १५ वर्षांपासून IT क्षेत्रात आहे. काही वर्ष अमेरिकेत राहिलो. आज हक्काचा एक फ्लॅट आहे पुण्याला. माझी पत्नी सौ . अनुराधा सुद्धा IT क्षेत्रात आहे. आई बाबा जालन्याला असतात. मला ८ वर्षाची एक गोड मुलगी आहे. सगळं काही सुरळीत आहे.
आज आयुष्य च्या एका टप्प्यात आल्या वर मला राहून राहून एक वाटते कि .. काही तरी एकूण केल पाहिजे. माझ्या सभोवति जी मंडळी आहेत , ती खूप संपन्न आहेत , हुशार आहेत , करिअर ओरिएंटेड आहेत. पण एक गोष्ट मला प्रकर्षांने जाणवते कि फार कमी लोकांच्या सामाजिक भावना ह्या ठळक आहेत . ठळक ह्या साठी कि काही लोकांच्या नक्कीच काही तरी वाटते पण ते व्यक्त होत नाही. विशेष म्हणजे ते दडपण मला हि आहे.
ते दडपण इथे सुटेल म्हणून हा खटाटोप .... Blow Your Mind
मयूर चिटणीस